कोरोना : नव्या ७ रुग्‍णांची भर, तिघांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 7 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, दिवसभरात 3 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या 61 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1847 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1840 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले …
 
कोरोना : नव्या ७ रुग्‍णांची भर, तिघांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 7 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, दिवसभरात 3 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज मिळाला आहे. सध्या 61 रुग्ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1847 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1840 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 652 तर रॅपिड टेस्टमधील 1188 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली शहर : 3, चिखली तालुका : वळती 1, गांगलगाव 1, दिवठाणा 1, देऊळगाव राजा तालुका : अंढेरा 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 7 रुग्ण आढळले आहेत. आज 3 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

बाधितांचा एकूण आकडा 87326 वर

आजपर्यंत 653787 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86593 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1782 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87326 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 61 रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.