कोरोना ः नव्या १८ बाधितांची भर, १४ जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात आज, १६ जुलैला कोरोनाचे नवे १८ बाधित समोर आले असून, १४ जणांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. सध्या रुग्णालयांत ४० रुग्ण उपचार घेत आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1942 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1920 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त …
 
कोरोना ः नव्या १८ बाधितांची भर, १४ जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात आज, १६ जुलैला कोरोनाचे नवे १८ बाधित समोर आले असून, १४ जणांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आला. सध्या रुग्‍णालयांत ४० रुग्‍ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1942 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1920 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 10 व रॅपिड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 707 तर रॅपिड टेस्टमधील 1213 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
देऊळगाव राजा तालुका : मंडपगाव 1, वाकी खुर्द 1, देऊळगाव मही 1, चिंचखेड 1, देऊळगाव राजा शहर : 1, मेहकर तालुका : जानेफळ 1, शेगाव शहर : 1, जळगाव जामोद शहर : 1, जळगाव जामोद तालुका : पिंपळगाव काळे 2, आसलगाव 1, चिखली शहर : 1, चिखली तालुका : बेराळा 3, शेलूद 1, मेरा बुद्रूक 1, सवडत 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 18 रुग्ण आढळले आहेत.

14 रुग्णांची कोरोनावर मात
आज 14 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 611900 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86484 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1830 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 611900 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87190 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 40 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 666 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.