कोरोनामुळे हिवरा आश्रम येथील गायींचा मेळावा दुसऱ्यांदा रद्द!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथे गोकुळाष्टमीनिमित्त भरवला जाणारा गायींचा मेळावा सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने हा उत्सव यंदा हाेणार आहे, अशी माहिती उत्सव समितीतर्फे देण्यात आली. ३० ऑगस्टला होणाऱ्या या उत्सवात सकाळी ग्रामसफाई, गोशाळा परिसर स्वच्छता, हरीहर तीर्थावर गोपालकृष्ण मंदिरा प्रार्थना, …
 
कोरोनामुळे हिवरा आश्रम येथील गायींचा मेळावा दुसऱ्यांदा रद्द!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथे गोकुळाष्टमीनिमित्त भरवला जाणारा गायींचा मेळावा सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने हा उत्‍सव यंदा हाेणार आहे, अशी माहिती उत्‍सव समितीतर्फे देण्यात आली. ३० ऑगस्‍टला होणाऱ्या या उत्‍सवात सकाळी ग्रामसफाई, गोशाळा परिसर स्‍वच्‍छता, हरीहर तीर्थावर गोपालकृष्ण मंदिरा प्रार्थना, आरती व पूजन, गुरांची आरोग्‍य तपासणी होणार आहे. त्‍यानंतर दुपारी चारपर्यंत घरोघरी जाऊन गायींचे पूजन व मोफत पशुखाद्य वाटप होईल. रात्री ११ ते १२ दरम्‍यान हभप निवृत्तीनाथ येवले शास्‍त्री महाराज ऑनलाइन व्याख्यान देणार आहेत.