कोरोनामुळे कुटूंब प्रमुखाचा मृत्यू झालेल्या कुटूंबांना ‘स्माईल’ योजनेचा आधार; अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटूंब प्रमुख असावा

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची योजनाबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटूंब प्रमुखाचा मृत्यू झाला असल्यास त्या कुटूंबियांचे पुनर्वसन स्माईल योजनेद्वारे करण्यात येणार आहे. एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत (support for marginalized individuals for livelihoods enterprie) SMILE स्माईल ही योजना व्यवसायासाठी कर्ज देण्याकरिता अंमलात येत आहे. या …
 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची योजना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः
कोरोनामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटूंब प्रमुखाचा मृत्यू झाला असल्यास त्या कुटूंबियांचे पुनर्वसन स्‍माईल योजनेद्वारे करण्यात येणार आहे. एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत (support for marginalized individuals for livelihoods enterprie) SMILE स्माईल ही योजना व्यवसायासाठी कर्ज देण्याकरिता अंमलात येत आहे. या योजनेनुसार प्रकल्पमूल्य 1 ते 5 लक्ष रुपये असल्यास कर्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी एनएसएफडीसी यांचा 80 टक्के सहभाग व 20 टक्के भांडवल अनुदान राहणार आहे. तसेच व्याजदर 6 टक्के असणार आहे.

या योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लक्ष रुपयांपर्यंत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाच्या कुटूंबातील सदस्य असावा. कुटूंब प्रमुखाच्या रेशन कार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाची मिळकत कुटूंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरिता नगर पालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र यापैकी एक दस्ताऐवज आवश्यक आहे. तसेच मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधार कार्ड प्रत, उत्पन्नाचा दाखला (3 लक्षापर्यंत), कोविड 19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड व वयाचा पुरवा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयात अथवा https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 या लिंकवर भरण्यात यावी. कोविडमुळे दुर्देवाने कुटूंब प्रमुखाच्या मृत्यू झालेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. एस धांडे यांनी केले आहे.