कोरोनाचे 7 बळी! कमी नमुने, कमी अहवाल: कमी पॉझिटिव्ह; पण मृत्यूचे तांडव कायम!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आठवड्याअखेरीस स्वॅब नमुने संकलन व प्राप्त अहवालांच्या संख्येत घट झाल्याने कोरोना पॉझिटिव्हचे आकडेही कमी आलेत! आज, 10 मे रोजी जिल्ह्यात केवळ 404 पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आला असला तरी मृत्यूचे थैमान कायमच राहिले! गत् 24 तासांत 7 रुग्ण दगावल्याने आरोग्य यंत्रणावरील ताण कायम राहिला. विकेंडला केवळ 1940 नमुने …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आठवड्याअखेरीस स्वॅब नमुने  संकलन व प्राप्त अहवालांच्या संख्येत घट झाल्याने कोरोना पॉझिटिव्हचे आकडेही कमी आलेत! आज, 10 मे रोजी जिल्ह्यात केवळ 404 पॉझिटिव्ह रुग्‍णांचा आकडा आला असला तरी मृत्यूचे थैमान कायमच राहिले! गत्‌ 24 तासांत 7 रुग्ण दगावल्याने आरोग्य यंत्रणावरील ताण कायम राहिला.

विकेंडला केवळ 1940 नमुने संकलन व जेमतेम 2601 अहवाल प्राप्त झाल्याने परिणामी 404 पॉझिटिव्ह रुग्‍णांचा आकडा सामोरे आलाय! यातही शेगाव तालुका 68आघाडीवर असून, त्याखालोखाल बुलडाणा 65, मोताळा 57, मलकापूर 38, खामगाव व चिखली प्रत्येकी 37, देऊळगाव राजा 36 असा क्रम आहे. याशिवाय जळगाव जामोद 23, मेहकर 5, नांदुरा 10, सिंदखेड राजा व  लोणार प्रत्येकी 12 आणि संग्रामपूर 4 असा अन्य तालुक्यांचा स्कोअर आहे. अलीकडच्या काळातील 404 हा सर्वात कमी आकडा ठरावा. मात्र त्यामुळे हुरळून जायचे काम नाय! याचे कारण ही तांत्रिक करामत आहे. आकडे कमी आहेत पण  कोरोना कुठेच आणि कशातही कमी नाही!

 481 बळी…

दरम्यान, कागदोपत्री रुग्ण कमी असले तरी मृत्यूचे तांडव कमी झालेले नाही! आज 7 बळींची नोंद झाली असून, यात खामगाव सामान्य रुग्णालयातील चौघांचा समावेश आहे. याशिवाय गाडगेबाबा रुग्णालय देऊळगाव राजा, महिला रुग्णालय बुलडाणा आणि हेडगेवार हॉस्पिटल चिखलीमधील प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.