किंचित कमी पण चार आकडीच! आज 1090 पॉझिटिव्ह; ब्रेक के बाद चिखलीत स्फोट!! 9 तालुक्यांतील उद्रेक कायम; संग्रामपूरची फिफ्टी लक्षवेधी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र दिनी एप्रिल एण्डच्या तुलनेत किंचित कमी आकडा असला तरी तो 4 आकडीच आहे. आज, 1 मे रोजी 1090 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे. 9 तालुक्यांतील उद्रेक कायम असतानाच चिखली तालुक्यात ब्रेक के बाद कोरोनाचा स्फोट झालाय! कोविड रुग्णालय उभारण्याची पॉझिटिव्ह स्पर्धा रंगलेल्या चिखली तालुक्यात …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र दिनी एप्रिल एण्डच्या तुलनेत किंचित कमी आकडा असला तरी तो 4 आकडीच आहे. आज, 1 मे रोजी 1090 कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांची नव्‍याने भर पडली आहे. 9 तालुक्यांतील उद्रेक कायम असतानाच चिखली तालुक्यात ब्रेक के बाद कोरोनाचा स्फोट झालाय!

कोविड रुग्णालय उभारण्याची पॉझिटिव्ह स्पर्धा रंगलेल्या चिखली तालुक्यात गत्‌ 24 तासांत भारंभार पेशंट निघाले असून, त्याने अडीचशेचा आकडा (257 पॉझिटिव्हचा) आकडा गाठलाय! यामुळे तालुक्यातील कोरोनाचा धोका वा तीव्रता कायम असल्याचे दिसून आले. मागील दीडेक आठवड्यापासून कोणत्याही कारणावरून राजकारण तापणाऱ्या या तालुक्यातील आकडे नियंत्रणात असल्याचे सुखद चित्र होते. मात्र कोरोनाला ते बहुधा पाहावले नाय!  कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या बुलडाणा (128 रुग्ण) व खामगाव (142) या तालुक्यात सेंच्युरी ठरलेली राहते. यामुळे तेथील आकड्यांचा कुणाला धक्का बसण्याचा विषयच कोविडकुमारने ठेवला नाहीये. मेहकर तालुका आता त्यांच्या टीममध्ये सहभागी झाला असून, तिथे आज 104 चा आकडा आलाय! यासह 13 पैकी 9 तालुक्यांतील कोरोनाचा धुमाकूळ कायम आहे. शेगाव 60, देऊळगाव राजा 89, मलकापूर 63, सिंदखेडराजा 68, नांदुरा 42 हे पट्टीचे खेळाडू हातभार  लावायला सदैव सज्ज राहतात.

हे असे कसे झाले?

आजवर कधी न खेळणाऱ्या संग्रामपूर तालुक्याने 58 चा पल्ला गाठून तेथील कार्यक्षम अधिकाऱ्यांना गुगली टाकून बोल्ड केलं! कोरोनाच्या महापुरात कोरडे राहणाऱ्या वा जेमतेम भिजणाऱ्या या तालुक्याने आज कमालच केली. यामुळे आजच्या अहवालातील ते ठळक वैशिष्ट्य ठरले. किंबहुना संग्रामपूर 24 तासांतील सामन्याचा  मॅन ऑफ द मॅच अर्थात मानकरी ठरलाय! त्याने टॉप 10 मधील लोणार 29, तसेच मोताळा 35, जळगाव जामोद 15 या तालुक्यांना मागे टाकण्याचा छोटा विक्रमही करून टाकला. गत 24 तासांत एकच रुग्ण दगावणे हाच आजचा एकमेव दिलासा ठरावा. मलकापुरातील ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये हा रुग्ण उपचार घेत होता.