काँग्रेसची गांधीगिरी… इंधन दरवाढीविरोधात जिल्हाभर पेट्रोलपंपावर चॉकलेट वाटप

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे आज, 7 जूनला जिल्हाभर गांधीगिरी करत पेट्रोलपंपावर चॉकलेट वाटप करण्यात आले. बुलडाणा शहरात हे आंदोलन जयस्तंभ चौकातील हिरोळे पेट्रोलपंपावर झाले. केंद्र सरकारने आंदोलनांकडे लक्ष दिले नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे शहराध्यक्ष दत्ता काकस यांनी सांगितले. आंदोलनात तालुकाध्यक्ष सुनिल तायडे, सुनिल सपकाळ, शेख मुजाहीद, विजय …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे आज, 7 जूनला जिल्हाभर गांधीगिरी करत पेट्रोलपंपावर चॉकलेट वाटप करण्यात आले. बुलडाणा शहरात हे आंदोलन जयस्तंभ चौकातील हिरोळे पेट्रोलपंपावर झाले.

केंद्र सरकारने आंदोलनांकडे लक्ष दिले नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे शहराध्यक्ष दत्ता काकस यांनी सांगितले. आंदोलनात तालुकाध्यक्ष सुनिल तायडे, सुनिल सपकाळ, शेख मुजाहीद, विजय कड, नितीन गायकवाड, योगेश परसे, शेख रियाज, सागर घट्टे, सै. आसीफ सै. यासीन आदी सहभागी झाले होते.

चिखलीत आंदोलन
चिखली येथे बीडीसी बॅंक चौकात असलेल्या वारे पेट्रोलपंप व चिखली- जालना राष्ट्रीय महामार्गावरील रेणुका पेट्रोल पंप येथे तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, तालुकाअध्यक्ष समाधान सुपेकर, शहराध्यक्ष अतहरोद्यीन काझी, जिल्हा उपाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, संजय पांढरे, सरटणीस डॉ. इसरार, युवक काँग्रेस अध्यक्ष पप्पू जागृत, मनोज लाहुडकर, सभापती ज्ञानेश्वर सुरूशे, राम जाधव, गजानन परिहार, अर्जुन गवई, राहुल सवडतकर, समाधान गिते, लक्ष्मण आंभोरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.