ओबीसींच्‍या आरक्षणासाठी आक्रमक होणे आमदार कुटेंना भोवले!; वर्षभरासाठी निलंबित

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील भाजपचे दमदार नेते आणि जळगाव जामोद विधानसभेचे आमदार, माजी मंत्री संजय कुटे यांना वर्षभरासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून गदारोळ झाला. यात आमदार कुटे यांनी असंसदीय वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. श्री. कुटे यांच्यासोबत भाजपच्या १२ आमदारांचेही निलंबन करण्यात आले आहे. …
 
ओबीसींच्‍या आरक्षणासाठी आक्रमक होणे आमदार कुटेंना भोवले!; वर्षभरासाठी निलंबित

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील भाजपचे दमदार नेते आणि जळगाव जामोद विधानसभेचे आमदार, माजी मंत्री संजय कुटे यांना वर्षभरासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून गदारोळ झाला. यात आमदार कुटे यांनी असंसदीय वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. श्री. कुटे यांच्यासोबत भाजपच्या १२ आमदारांचेही निलंबन करण्यात आले आहे. आमदार कुटे यांनी अध्यक्षांच्या दालनात जाऊन अध्यक्षसमोरील माईक उखडून टाकला, यावेळी ते प्रचंड आक्रमक झाले होते.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा झाला. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप जाधवांनी केला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलs मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आला. निलंबित झालेल्या आमदारांना पुढील वर्षभरात होणाऱ्या अधिवेशनात सहभाग घेता येणार नाही.