एसटी बस-ट्रकच्‍या भीषण अपघातात प्रवासी वृद्ध महिला ठार; २५ जण जखमी, देऊळगाव शहराजवळील दुर्घटना

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन एक प्रवासी वृद्ध महिला जागीच ठार झाली तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जालना- देऊळगाव राजा रोडवर देऊळगाव राजा शहरातील बायपासवरील हॉटेल विरासमोर हा भीषण अपघात आज, २३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास …
 
एसटी बस-ट्रकच्‍या भीषण अपघातात प्रवासी वृद्ध महिला ठार; २५ जण जखमी, देऊळगाव शहराजवळील दुर्घटना

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन एक प्रवासी वृद्ध महिला जागीच ठार झाली तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जालना- देऊळगाव राजा रोडवर देऊळगाव राजा शहरातील बायपासवरील हॉटेल विरासमोर हा भीषण अपघात आज, २३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.

गयाबाई मल्हारजी खंडारे (७०, रा. मेहकर) असे ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्‍या औरंगाबादवरून मेहकरला जाण्यासाठी बसल्या होत्या. चालक शेख मोसीन व वाहक तडवी फकिरा हे औरंगाबाद आगाराची बस (क्र. एमएच २० बीएल २५६६) औरंगाबादवरून मेहकरला घेऊन येत होते. त्‍यांच्‍यासह बसमध्ये ३० प्रवासी होते. देऊळगाव राजा शहरातील बायपासजवळ हॉटेल विरासमोर चिखलीकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिने चालकाच्‍या बाजूने पूर्णपणे बस फाडत नेली. त्‍यामुळे या बाजूचे सर्वच प्रवासी जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमींना देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जालना येथे हलविण्यात आले आहे. मृतक व जखमींची ओळख पटविण्याचे कार्य सुरू आहे.