आधी केले मग सांगितले… जुनेद अली यांच्‍यातर्फे गरिबांना धान्य, कपडे वाटप; मग समाजबांधवांना म्‍हणाले, ईद गरजूंना मदत करून साजरी करा!!

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेकांचे रोजगार बंद आहेत. त्यामुळे यंदा रमजान ईदसाठी कोणताही बडेजाव व खर्च न करता ती साधेपणाने साजरी करावी. आपल्या परिसरातील गरिबांना गहू, तांदूळ व साडीचोळीचे वाटप करत मदत करण्याचे आवाहन तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जुनेद …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्‍याने लॉकडाऊन सुरू आहे. त्‍यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेकांचे रोजगार बंद आहेत. त्‍यामुळे यंदा रमजान ईदसाठी कोणताही बडेजाव व खर्च न करता ती साधेपणाने साजरी करावी. आपल्या परिसरातील गरिबांना गहू, तांदूळ व साडीचोळीचे वाटप करत मदत करण्याचे आवाहन तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जुनेद अली यांनी केले आहे.

लॉकडाऊनमुळे गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या काळात गरिबांची काळजी घेणे आवश्यक आहे. सण उत्सव, ईदसाठीचा खर्च टाळून वंचितांना मदत करण्यासाठी सध्या अनेक समाजकर्ते पुढे येत आहे.  ईदसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. यंदा ईदच्या खरेदीसाठी होणारा खर्च टाळून त्या पैशातून गरिबांना मदत करण्यासाठी केवळ आवाहन करण्यावर न थांबता जुनेद अली यांनी पुढाकार घेतला. त्‍यांनी गावातील गरजूंना गहू, तांदूळ व साडीचोळीचे वाटप केले. गतवर्षी देखील अली यांनी ६० गरजूंना मदत केली होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १५ हजारांची मदत छोट्या व्यवसायिकांतून जमा करण्याचा पुढाकार घेतला होता. यावेळी कौसरअली काझी, शेख हाशम, शेख समशेर, शादमान अली, जाकेर अली, रहेमान शेख, सुनील जायभाये, कचरू भारस्कर, शेख फहीम, तसलीम अली, शेख अनिस, अतिफ अली, राफे अली, राजीक अली, शेख निजाम आदी उपस्थित होते.