आदर्श घेण्यासारखे… वडिलांच्‍या जयंतीला तिन्‍ही भावंडांनी अख्खे गाव केले सॅनिटाइज!

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे) ः सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील कै.विजय मखमले यांची 1 मे रोजी जयंती. त्यांचे कुटुंबिय हा दिवस दरवर्षी गावात सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करतात. यावर्षी कोरोना महामारीच्या संकटात गावाला वाचवण्यासाठी त्यांची तिन्ही मुले महेश, महेंद्र व मंगेश यांनी अवघे गावच सॅनिटाइज करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावातच नव्हे तर पंचक्रोशीत त्यांच्या …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे) ः सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील कै.विजय मखमले यांची 1 मे रोजी जयंती. त्यांचे कुटुंबिय हा दिवस दरवर्षी गावात सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करतात. यावर्षी कोरोना महामारीच्या संकटात गावाला वाचवण्यासाठी त्यांची तिन्ही मुले महेश, महेंद्र व मंगेश यांनी अवघे गावच सॅनिटाइज करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावातच नव्‍हे तर पंचक्रोशीत त्‍यांच्‍या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

गाव व लगतचा परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र,बँका व शासकीय कार्यालये व खासगी दवाखाने पूर्णपणे निर्जंतूक करण्यात आले. अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबविण्याचे त्यांनी ठरविले आहे. समाजासाठी काही तरी देणं लागते म्हणून उपक्रम राबवत असल्याचे तिन्‍ही भावंडं सांगतात. यावेळी उपसरपंच भगवानराव उगले, सरपंचपती बंडू उगले, ग्रा. पं. सदस्य नामदेव उगले, पत्रकार भगवान साळवे, पांडुरंग कापसे व  कै.विजय मखमले विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.