आज 626 पॉझिटिव्ह! बुलडाणा टॉपवरच; मेहकर, मलकापूर मतदारसंघातील थैमान कायम!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गत् 24 तासांत जिल्ह्यात 626 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तुलनेने ही संख्या कमी व दिलासादायक वाटत असली तरी बुलडाणा तालुक्यातील थैमान कायम असणे व मेहकर, मलकापूर विधानसभा मतदारसंघात कोरोनाने मारलेली मुक्कामी मुसंडी आरोग्य यंत्रणा व प्रशासनाची चिंता वाढविणारी बाब ठरली आहे.बुलडाणा तालुक्यातील कोरोनाचा प्रकोप अनेक दिवसांपासून कायम आहे. …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गत् 24 तासांत जिल्ह्यात 626 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तुलनेने ही संख्या कमी व दिलासादायक वाटत असली तरी बुलडाणा तालुक्यातील थैमान कायम असणे व मेहकर, मलकापूर विधानसभा मतदारसंघात कोरोनाने मारलेली मुक्‍कामी मुसंडी आरोग्य यंत्रणा व प्रशासनाची चिंता वाढविणारी बाब ठरली आहे.
बुलडाणा तालुक्यातील कोरोनाचा प्रकोप अनेक दिवसांपासून कायम आहे. किरकोळ अपवाद वगळता दररोज तीन आकड्यांत रुग्ण येत आहे. काल साडेतीनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने तालुक्यात गजहब उदक होता. या तुलनेत आज कमी म्हणजे 126 रुग्ण आले असले तरी हा आकडाही गंभीरच आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाने 4 तालुक्यांत जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. आजही त्यातील मेहकर 97, लोणार 70, मलकापूर 68, नांदुरा 71 या तालुक्यांतील पॉझिटिव्ह संख्या वाढतीच आहे. खामगाव आज 53 रुग्णांसह शांत आहे एवढंच! अन्य तालुक्यापैकी देऊळगाव राजा 37, चिखली 34, मोताळा 29, सिंदखेडराजा 12, संग्रामपूर 22, जळगाव 3, शेगाव 4रुग्ण हे तालुके आजतरी आटोक्यात आहेत. उद्या हे चित्र आमूलाग्र बदललेले असू शकते.