अत्यावश्यक सेवांमध्ये ‘काही‘ सवलती!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 मे ते 20 मेदरम्यान जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. यात अत्यावश्यक सेवांमध्ये काही सवलती दिल्या आहेत. पेट्रोलपंप : ग्रामीण तसेच शहरी भागातील पेट्रोल पंपावरून केवळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मशागतीची कामे तसेच मालाची वाहतूक करण्याकरिता ट्रॅक्ट्रर्सना डिझेल इंधन पुरवठा करता येईल. कोर्टाची कार्यालयीन कामे सुरू …
 
अत्यावश्यक सेवांमध्ये ‘काही‘ सवलती!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 मे  ते 20 मेदरम्‍यान जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. यात अत्यावश्यक सेवांमध्ये काही सवलती दिल्या आहेत.

  • पेट्रोलपंप : ग्रामीण तसेच शहरी भागातील पेट्रोल पंपावरून केवळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मशागतीची  कामे तसेच मालाची वाहतूक करण्याकरिता ट्रॅक्ट्रर्सना डिझेल इंधन पुरवठा करता येईल. कोर्टाची कार्यालयीन कामे सुरू असल्याने वकिलांना पेट्रोल, डिझेल देण्यात यावे.
  • बँकिंग :  रुग्णालये, गॅस वितरण सेवा, ऑक्सीजन पुरवठा, औषधी दुकाने यांच्‍याकडे तसेच पेट्रोल पंपावरील जमा होणारी रक्कम बँकेत जमा करणे यासाठी संबंधित कंपनीच्या नावाने व्यवहार करण्याकरिता सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यानचा वेळ देण्यात येत आहे.
  • अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत कर्मचारी : दूरसंचार, टेलिकॉम सेवा (मोबाईल रिचार्ज सेंटर वगळता) विद्युत पारेषण आदी सेवा सुरळीतपणे राहावी या करिता ही सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना अपवादात्मक परिस्थितीत कामे करता येईल. संबंधित आस्थापनांनी त्यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. धान्य वितरण प्रणाली सुरळीत सुरू राहण्याचे दृष्टीने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतची वाहतूक व वाटप अनुज्ञेय राहील.  हॉटेल, रेस्टारंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 10 ते दुपारी 12 व रात्री 7 ते रात्री 9 या दरम्यान सुरू राहील. अत्यावश्यक कामकाजाकरिता व कोविड च्या अनुषंगाने कामकाज करण्याकरिता आवश्यक असणारे विभाग, कार्यालये सुरु राहतील.