राममंदिरासाठी हातभार लागतोय हे भाग्यच..! जिल्हाभरात श्रीराम मंदिर निधी समर्पण महाअभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्री रामाचे भव्य मंदिर उभे राहत आहे. 4 लाख रामभक्तांच्या बलिदानानंतर हा सुवर्णक्षण आम्हाला याची देही याची डोळा पाहता येणार आहे हे आमच्या जन्माचे भाग्यच आहे, अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहेत. भव्य श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान सध्या जिल्ह्यात सुरू आहे. या अभियानाला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्री रामाचे भव्य मंदिर उभे राहत आहे. 4 लाख रामभक्तांच्या बलिदानानंतर हा सुवर्णक्षण आम्हाला याची देही याची डोळा पाहता येणार आहे हे आमच्या जन्माचे भाग्यच आहे, अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहेत. भव्य श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान सध्या जिल्ह्यात सुरू आहे. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
माझ्या वडिलांनी सव्वा रुपया दिला होता, मीही सव्वा देईन…
1989 च्या कारसेवेदरम्यान माझ्या वडिलांनी मंदिर निर्माणासाठी सव्वा रुपया दिला होता. मीसुद्धा सव्वा देईन असे म्हणत आलेल्या कार्यकर्त्याजवळ सव्वा लाख रुपयांचा धनादेश एकाने दिला.
भांडे घासणारी मावशी म्हणाली, राम मंदिरासाठी मलाही द्यायचंय..
भांडे घासणारी मावशी. घरोघरी जाऊन भांडे घासायचे अन् उदरनिर्वावाह चालवायचा. अभियानादरम्यान कार्यकर्त्यानी एका घरी जाऊन विषय सांगितला आणि निधी घेतला. घरी भांडे घासणार्‍या मावशीनेही मलाही निधी द्यायचा आहे. माझ्या पगारातून पैसे कमी करा पण यासाठी 2000 रुपये द्या, असे म्हणत मालकाकडून पैसे घेत निधी समर्पित केला.
चिमुकल्यांनी दिले खाऊसाठी साचवलेले पैसे…
या अभियानादरम्यान अंचरवाडी येथील दोन चिमुकले शिवम आणि यश यांनी साचवलेले पैसे राममंदिर निधीसाठी समर्पित केले.
70 वर्षांची आजी म्हणते, थांबा,आज मी मजुरीला जाते अन् उद्या निधी देते…
अभियानादरम्यान कोलारा (ता. चिखली) येथील 70 वर्षीय आजीजवळ त्या दिवशी देण्यासाठी पैसे नव्हते. परंतु रामाचे मंदिर होणार आहे. त्यासाठी मला पैसे द्यायचेय. तुम्ही थांबा आज मी रोजंदारीवर कमाला जाते अन् उद्या तुम्हाला पैसे देते, असे ती आजी म्हणाली.