कोरोना : नव्या ४५ बाधितांची भर, ३४ रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 7 जुलैला कोरोनाच्या 45 नव्या बाधितांची भर पडली, तर 34 रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या रुग्णालयांत 176 बाधितांवर उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2845 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2800 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 45 अहवाल …
 
कोरोना : नव्या ४५ बाधितांची भर, ३४ रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 7 जुलैला कोरोनाच्‍या 45 नव्या बाधितांची भर पडली, तर 34 रुग्‍णांना बरे झाल्याने रुग्‍णालयातून सुटी देण्यात आली. सध्या रुग्णालयांत 176 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2845 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2800 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 22 व रॅपिड टेस्टमधील 23 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 508 तर रॅपिड टेस्टमधील 2292 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
शेगाव शहर : 3, शेगाव तालुका : गौलखेड 1, शिरसगाव 1, टाकळी विरो 1, खामगाव शहर : 3, खामगाव तालुका : टेंभुर्णा 1,घाटपुरी 2, नांदुरा शहर : 6, नांदुरा तालुका : माटोडा 1, बुलडाणा शहर : 5, बुलडाणा तालुका : ढालसावंगी 1, लोणार शहर : 1, मलकापूर शहर : 1, देऊळगाव राजा शहर : 1, जळगाव जामोद तालुका : पळसखेड 1, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 2, विझोरा 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : कवठळ 1, शेलूद 2, बेराळा 1, नायगाव खुर्द 4, मालखेड 1, मालगणी 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 45 रुग्ण आढळले आहेत.

34 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 34 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 590846 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86198 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1330 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87038 कोरोनाबाधित रुग्ण सध्या रुग्णालयात 176 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 664 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.