आमदार संजय गायकवाडांच्‍या त्‍या वक्‍तव्‍यावर ‘सांप्रदाय’ खवळला!; तुमचे महाराज लोकं मंडपातून बाई पळवून नेतात तेव्‍हा नाही का बदनामी होत?; आमदार संजय गायकवाडांनीही सुनावले!!; वाद प्रीप्‍लॅन?

बुलडाणा (मनोज सांगळे मो. 9822988820ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना प्रादुर्भावात स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. उपासतापास बंद करा. रोज 4 अंडी खा, दिवसाआड मांसाहार करा… जान है तो जहांन है… प्रोटिनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे… असे आवाहन बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. ते एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर, सोशल मीडियावर ते कात्रण …
 

बुलडाणा (मनोज सांगळे मो. 9822988820ः  बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना प्रादुर्भावात स्‍वतःची काळजी स्‍वतःच घ्यावी लागणार आहे. उपासतापास बंद करा. रोज 4 अंडी खा, दिवसाआड मांसाहार करा… जान है तो जहांन है… प्रोटिनयुक्‍त आहार घेणे आवश्यक आहे… असे आवाहन बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. ते एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर, सोशल मीडियावर ते कात्रण व्‍हायरल झाले आणि वारकरी सांप्रदायापर्यंत पोहोचले आणि सांप्रदायातील काही मंडळींना ते खटकले. त्‍यांनी आमदारांना फोन लावून नाराजी व्‍यक्‍त केली. यावेळी आमदारांनी माझे हे मत विचारपूर्वक व्‍यक्‍त केले आहे. माझ्या चाहत्‍यांसाठी आहे. माझ्यासमोर अनेक लोक मरत आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍या आरोग्‍याला धरून ते केले आहे, असे सांगण्याचा प्रयत्‍न केला, पण तरीही या मंडळींनी यामुळे धर्माची बदनामी झाली, असे म्‍हणत कोंडीत पकडण्याचा प्रयत्‍न केल्याचे कॉल रेकॉर्डिंगवरून दिसून येत आहे. यामुळे खवळलेल्या गायकवाडांनी त्‍यांना सुनावले. तरीही पुन्‍हा पुन्‍हा ‘अंगावर’ येत डिवचले जात असल्याने गायकवाडांनीही मग त्‍यांना शिंगावर घेतले. ‘तुमचे महाराज लोकं मंडपातून बाई पळवून नेतात तेव्‍हा नाही का बदनामी होत?, अशा स्‍पष्ट शब्‍दांत त्‍यांना सुनावले. यामुळे ऐन कोरोनाच्‍या काळात पुन्‍हा एकदा वाद वाढविण्याचे प्रयत्‍न होत असल्याचे दिसून येत आहे. हा वाद जाणूनबुजून वाढवून पुन्‍हा एकदा गायकवाडांना अडचणीत आणण्याचा प्रयत्‍न होत असल्‍याचे समोर येत असून, यामागे राजकीय ‘हात’ असल्याचीही चर्चा समोर येत आहे.

वाद प्रीप्‍लॅन?

आमदार संजय गायकवाड यांनी केलेले वक्‍तव्‍य अनेकांनी मजेशीर पद्धतीने घेतले तर काहींनी त्‍यावर विचारही केला. पण आक्षेप घेण्यासारखे कुणाला वाटले नाही. पण आज सकाळी एकदम लागोपाठ वारकरी सांप्रदायातील काही महाराजांचे फोन येणे सुरू झाल्याने आमदार गायकवाडही चक्रावले. बुलडाणा लाइव्‍हने त्‍याही पुढे जात माहिती घेतली असता बुलडाण्यातील एका नेत्‍याने हा वाद प्रीप्‍लॅन पद्धतीने पेटविल्याचे समोर येत आहे. सांप्रदायातील मंडळींना गायकवाडांच्‍या वक्‍तव्‍याबद्दल भडकावणे आणि गायकवाडांनी त्‍यावर खवळणे या नेत्‍याला अपेक्षित होते. तसेच घडल्‍याचे दिसून येत आहे.

आमदार गायकवाड विधानावर ठाम

आमदार गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना आपण जे विधान केले, त्‍यावर ठाम असल्याचे सांगितले.