५० हजारांसाठी विवाहितेचा मांडला छळ, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल, लोणार तालुक्‍यातील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५० हजार रुपयांसाठी विवाहितेचा छळ मांडणाऱ्या पतीसह ६ जणांविरुद्ध किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा परवीन सलमान खाँ पठाण (२४, रा. सुलतानपूर, ता. लोणार) हिने या प्रकरणी तक्रार दिली. तिचे सलमान खाँ समशेर पठाणसोबत लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर काहीच दिवसांनंतर तिच्या नवऱ्याने व सासरच्या लोकांनी …
 

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५० हजार रुपयांसाठी विवाहितेचा छळ मांडणाऱ्या पतीसह ६ जणांविरुद्ध किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमा परवीन सलमान खाँ पठाण (२४, रा. सुलतानपूर, ता. लोणार) हिने या प्रकरणी तक्रार दिली. तिचे सलमान खाँ समशेर पठाणसोबत लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर काहीच दिवसांनंतर तिच्या नवऱ्याने व सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला. तुझ्या वडिलांकडून ५० हजार रुपये आण, असे म्हणत मारहाण करायचे. छळाला कंटाळून ती काल, ५ ऑगस्टला माहेरी दुसरबीड येथे आली आहे. कालच तिने किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून तिचा पती सलमान खाँ समशेर पठाण, सासरा समशेर खाँ शब्बीर खाँ पठाण, सासू शहेनाजबी समशेर खाँ पठाण, नणंद आस्मा ऊर्फ चंदा शब्बीर खाँ पठाण, नंदई शब्बीर खाँ हमीद खाँ पठाण व दीर इरफान खाँ पठाण (सर्व रा. सुलतानपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.