५ पुरुष, ३ तरुणी जिल्ह्यातून बेपत्ता!; सप्‍टेंबरमध्ये आजपर्यंत ४१ बेपत्ता, यात १३ तरुणींचा समावेश!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून गेल्या ५ दिवसांत ५ पुरुष, ३ तरुणी गायब झाल्या आहेत. याच महिन्यात आज, २१ सप्टेंबरपर्यंत बेपत्ता होणाऱ्यांचा आकडा तब्बल ४१ असून, यात १३ तरुणींचा समावेश आहे. चिखली तालुक्यातील खैरव येथील दामोधर कुटे यांच्या शेतातून सौ. पूनम प्रवीण पायघन (२१) ही विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार आज चिखली पोलीस ठाण्यात करण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून गेल्या ५ दिवसांत ५ पुरुष, ३ तरुणी गायब झाल्या आहेत. याच महिन्यात आज, २१ सप्‍टेंबरपर्यंत बेपत्ता होणाऱ्यांचा आकडा तब्‍बल ४१ असून, यात १३ तरुणींचा समावेश आहे.

चिखली तालुक्‍यातील खैरव येथील दामोधर कुटे यांच्‍या शेतातून सौ. पूनम प्रवीण पायघन (२१) ही विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार आज चिखली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आजच किनगाव राजा येथील आश्विन पंढरी सानप (४२) हेही बेपत्ता झाल्याची नोंद किनगाव राजा पोलिसांनी केली आहे. काल गणेश सुखदेव शिरसाट हे चिखलीच्‍या संभाजीनगरातून बेपत्ता झाल्याची नोंद चिखली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गणेश कैलास पवार (२८) हे लिहा बुद्रूक (ता. मोताळा) येथून बेपत्ता झाले. तशी नोंद धामणगाव बढे पोलिसांत झाली आहे.

अन्य बेपत्ता ः आसलगाव (ता. जळगाव जामोद) येथून १८ वर्षीय शीतल अशोक भटकर ही तरुणी बेपत्ता झाली. ती हरवल्याची तक्रार तिच्‍या घरच्यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिली. नांदुरा तालुक्‍यातील माळेगाव गोंड येथील १८ वर्षीय पवन राजेंद्र आळशी हा घरातून निघून गेल्याची तक्रार नांदुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. टुनकी खुर्द (ता. संग्रामपूर) येथून मयुरी पूर्णाजी मोहंडे ही १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार सोनाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हिवरा खुर्द (ता. मेहकर) येथील सदानंद रामदास दळवी (३८) हे बेपत्ता झाल्याची तक्रार जानेफळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.