१६ वर्षीय मुलीला रस्‍त्‍यात अडवून दिला मोबाइल… त्‍यात होते अश्लील व्हिडिओ!; तीन तरुणांचे कृत्‍य, रात्री घरी येऊन वाजवला दरवाजा!!, शेगाव तालुक्‍यातील धक्‍कादायक प्रकार

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १६ वर्षीय मुलीला रस्त्यात अडवून मोबाइल दिला. या मोबाइलमध्ये चक्क अश्लील व्हिडिओ होते. मोबाइलवर बोलली नाही तर जीवे मारू, अशी धमकीही तिला देण्यात आली. वरूड (ता. शेगाव) येथे ही घटना काल, २ सप्टेंबरला समोर आली असून, तीन तरुणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. अक्षय महादेव …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १६ वर्षीय मुलीला रस्‍त्‍यात अडवून मोबाइल दिला. या मोबाइलमध्ये चक्‍क अश्लील व्हिडिओ होते. मोबाइलवर बोलली नाही तर जीवे मारू, अशी धमकीही तिला देण्यात आली. वरूड (ता. शेगाव) येथे ही घटना काल, २ सप्‍टेंबरला समोर आली असून, तीन तरुणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी मुलीच्‍या वडिलांच्‍या तक्रारीवरून गुन्‍हा दाखल केला आहे.

अक्षय महादेव भोजने (२१), स्वप्नील दादराव भोजने, सुरेश विलास भोजने (सर्व रा. वरूड) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. गावातीलच १६ वर्षीय मुलगी शाळेत जात असताना हे तिघे तिचा पाठलाग करायचे. तिची छेड काढायचे. अक्षयने तिला रस्‍त्‍यात गाठून बळजबरीने मोबाइल दिला व मोबाइलवर बोलली नाही तर जीवाने मारून टाकीन अशी धमकी देऊन शिविगाळ केली. हा मोबाइल तिच्‍या घरच्यांनी तपासला असता त्‍यात अश्लील व्हिडिओ होते. एवढ्यावरच हे तीन तरुण थांबले नाहीत. अक्षय व सुरेश यांनी मुलीच्‍या घराचा दरवाजा वाजवला. तिच्‍या वडिलांनी दरवाजा उघडला असता दोघेही पळून गेले, असे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक व्दारकानाथ गोदंके करत आहेत.