सुखद ब्रेकिंग! जिल्ह्यात ४ ऑक्टोबरपासून वाजणार घंटा!! साडेतीन लाख विद्यार्थ्यांना होणार शाळांचे दर्शन; मात्र आदेशात निर्देशांची भरमार

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना प्रकोपामुळे घरूनच शाळा करणाऱ्या व परीक्षा न देताच उत्तीर्ण होणाऱ्या जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांसह पालकांसाठी ही बातमी मोठीच खुशखबर हाय! येत्या 4 तारखेला प्राथमिक वगळता इतर शाळांच्या घंटा वाजणार असून, ओसाड व सुनसान पडलेल्या शाळा लाखो विद्यार्थ्यांनी गजबजणार आहेत! दरम्यान, शासनाने जारी केलेल्या आदेशात संस्थाचालक, शिक्षक, कर्मचारीच …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना प्रकोपामुळे घरूनच शाळा करणाऱ्या व परीक्षा न देताच उत्तीर्ण होणाऱ्या जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांसह पालकांसाठी ही बातमी मोठीच खुशखबर हाय! येत्या 4 तारखेला प्राथमिक वगळता इतर शाळांच्या घंटा वाजणार असून, ओसाड व सुनसान पडलेल्या शाळा लाखो विद्यार्थ्यांनी गजबजणार आहेत! दरम्यान, शासनाने जारी केलेल्या आदेशात संस्थाचालक, शिक्षक, कर्मचारीच नव्हे पालक अन्‌ विद्यार्थ्यांसाठी सुद्धा निर्देश दिले आहेत.


जिल्ह्यातील ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी आणि शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 40 हजार 424 इतकी आहे. जिल्ह्यातील शासकीय, खासगी संस्थाचालक व मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळा सुरू करण्याची तयारी चालविली आहे. यासाठी मागील 24 ऑगस्ट रोजी टास्क फोर्सने काही शिफारशी व सूचना दिल्या होत्या. 30 सप्टेंबरच्या परिपत्रकाद्वारे अतिरिक्त मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

हेल्थ क्लिनिक आणखी बरेच काही…
दरम्यान, कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रत्येक शाळेत शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक सुरू करण्याची व ग्रामीण भागातील शाळा आरोग्य केंद्रांशी संलग्न करण्याचे निर्देश आहेत. विद्यार्थ्यांच्या तापमानाची नियमित तपासणी करावी व यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घ्यावी. मुलांना शाळेत शक्यतो पायी येण्यास प्रवृत्त करण्याचे वा स्‍कूल बसमध्ये एका सीटवर एकासच बसण्याचे निर्देश आहेत. विद्यार्थ्यांना वारंवार हात धुण्याचे, सॅनिटायझरचा वापर करण्याचे, होमवर्क ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याचे वा शक्यतो शाळेतच करवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अन्य निर्देश…

  • सध्या कोणतेही खेळ घेऊ नयेत. स्थिती सामान्य झाल्यावर काही खेळ घ्यावे, संपर्क वाढविणारे कब्बडी, खोखो सारखे खेळ नकोत.
  • खेळाने लगेच थकणारे, ताप- सर्दी, जोरात श्वास घेणारे, लाल डोळे, बोट हात सांधे सुजलेले, उलट्या जुलाब करणारे विद्यार्थी यांच्यावर लक्ष द्यावे.
  • मानसिक दृष्टीने विद्यार्थ्यांवर लक्ष देण्याच्या सूचना. जास्त चिडचिड, रागीट, नुसतेच शांत बसून राहणारे, वयाशी विसंगत वर्तणूक करणारे अशावर बारीक लक्ष द्यावे.
  • पहिल्या 2 आठवड्यांत थेट शिक्षणावर भर न देता शाळेची सवय होऊ द्यावी, पालकांशी ऑफ, ऑन लाईन संपर्क ठेवावा.

पालक अन्‌ विद्यार्थी…
शाळेतून घरी आल्यावर थेट बाथरूममध्ये जावे, युनिफॉर्म साबणाच्या पाण्यात बुडवावा. मास्क धुवावा. पालकांनी पुरेसे मास्क धुवावे व रोज धुवावे. मुलांना शाळेच्या वेळेत तयार ठेवावे. मोबाइलची सवय लागणार नाही याची काळजी घ्यावी.