सिंदखेड राजा ः पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहराजवळ असलेल्या ओढ्याला आलेल्या पुरात एक महिला वाहून गेल्याची घटना काल, ७ सप्टेंबरच्या सायंकाळी पाचच्या सुमारास घडली होती. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही मृतदेह सापडला नव्हता. दुसऱ्या दिवशी आज, ८ सप्टेंबरला सकाळी ११ ला मृतदेह सापडला. विजय तायडे, दीपक भालेराव यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात यश मिळवले. …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहराजवळ असलेल्या ओढ्याला आलेल्या पुरात एक महिला वाहून गेल्याची घटना काल, ७ सप्‍टेंबरच्‍या सायंकाळी पाचच्‍या सुमारास घडली होती. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही मृतदेह सापडला नव्हता. दुसऱ्या दिवशी आज, ८ सप्‍टेंबरला सकाळी ११ ला मृतदेह सापडला. विजय तायडे, दीपक भालेराव यांनी सहकाऱ्यांच्‍या मदतीने मृतदेह शोधण्यात यश मिळवले. सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून अंत्यसंस्कार करण्यात आले.

काल सायंकाळी पाचला शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. नाले, ओढे जलमय झाले होते. याच सुमारास जिजामातानगर मधील मंगला गणेश शिंगणे व अन्य दोन महिला घरी परतत असताना ओढ्याला पूर असल्याने एकमेकींचा हात धरून पुरातून सुरक्षित बाहेर पडण्याच्या प्रयत्न करत होत्या. मात्र त्याच वेळी त्यातील ४० वर्षीय मंगला गणेश शिंगणे ही महिला पुरात वाहून गेली होती. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र त्‍यांना शोधण्यात यश आले नव्‍हते. अखेर आज सकाळी पुन्‍हा शोधकार्य हाती घेण्यात आले होते.