सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; चिखली तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सर्पदंश झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे उपचारापूर्वीच निधन झाले. ही घटना आज, ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. प्रकाश श्रीराम तायडे (४५, रा. टाकरखेड हेलगा ता. चिखली) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्रकाश तायडे हे आज त्यांच्या शेतातील पिकावर सोयाबीन फवारणीचे काम करत होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सर्पदंश झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे उपचारापूर्वीच निधन झाले. ही घटना आज, ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. प्रकाश श्रीराम तायडे (४५, रा. टाकरखेड हेलगा ता. चिखली) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्रकाश तायडे हे आज त्यांच्या शेतातील पिकावर सोयाबीन फवारणीचे काम करत होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास औषध टाक्यात टाकत असताना त्यांच्या हाताला कोब्रा या विषारी सापाने चावा घेतला. लगेच त्यांना चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लगेच बुलडाणा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.