विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चार दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला. ही घटना अंढेरा (ता. देऊळगाव राजा) येथे आज, २१ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. सिद्धार्थ इंगळे (२५, रा. अंढेरा, ता. देऊळगाव राजा) असे मृत युवकाचे नाव आहे. सिद्धार्थ गेल्या ४ दिवसांपासून घरून बेपत्ता होता. आज अंढेरा शिवारातील डॉ. संतोष …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चार दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला. ही घटना अंढेरा (ता. देऊळगाव राजा) येथे आज, २१ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली.

सिद्धार्थ इंगळे (२५, रा. अंढेरा, ता. देऊळगाव राजा) असे मृत युवकाचे नाव आहे. सिद्धार्थ गेल्या ४ दिवसांपासून घरून बेपत्ता होता. आज अंढेरा शिवारातील डॉ. संतोष इंगळे यांच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करण्यात आली. सिद्धार्थची आत्महत्या आहे की हत्या, हे मात्र अद्यापपर्यंत समोर येऊ शकले नाही.