विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; मेहकर तालुक्यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ही घटना बोरी (ता. मेहकर) येथे काल, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. बोरी येथील मदन झरे (५४) घरात काम करताना त्यांना विजेचा धक्का लागला. त्याच वेळी अंघोळ करत असलेले त्यांचे लहान भाऊ नारायण झरे (४५) त्यांना वाचवायला गेले. त्यांनाही विजेचा शॉक लागला. …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ही घटना बोरी (ता. मेहकर) येथे काल, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली.

बोरी येथील मदन झरे (५४) घरात काम करताना त्यांना विजेचा धक्का लागला. त्याच वेळी अंघोळ करत असलेले त्यांचे लहान भाऊ नारायण झरे (४५) त्यांना वाचवायला गेले. त्यांनाही विजेचा शॉक लागला. समयसूचकता राखत शेजारच्यांनी मेन स्वीच बंद केले. त्यामुळे घरातील वीजप्रवाह बंद झाला. दोघा भावांना तात्काळ मेहकर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोन्ही भावांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मेहकर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकाचवेळी दोन भावांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.