वरवट बकालमध्ये बजाजचे शो रूम फोडले; दोन दुचाकी लांबवल्या

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील वरवट बकाल येथील बजाज कंपनीचे शोरूम चोरट्यांनी फोडून दोन दुचाकी चोरून नेल्या. ही घटना १ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. वरवट बकाल ते सोनाळा मार्गावर सुनील इंगळे यांच्या मालकीचे माऊली मोटर्स नावाने बजाजचे दुचाकीचे शो रूम आहे. १ सप्टेंबरच्या रात्री शोरूम बंद करण्यात आले. मध्यरात्री चोरट्यांनी शो रूम …
 

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील वरवट बकाल येथील बजाज कंपनीचे शोरूम चोरट्यांनी फोडून दोन दुचाकी चोरून नेल्या. ही घटना १ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली.

वरवट बकाल ते सोनाळा मार्गावर सुनील इंगळे यांच्या मालकीचे माऊली मोटर्स नावाने बजाजचे दुचाकीचे शो रूम आहे. १ सप्टेंबरच्या रात्री शोरूम बंद करण्यात आले. मध्यरात्री चोरट्यांनी शो रूम फोडून पल्सर आणि प्लॅटिना अशा दोन लाखांच्या दोन दुचाकी चोरून नेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला शो रूम उघडण्यासाठी इंगळे आले असता शटरची दोन्ही कुलूपे तोडलेली आणि दोन दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्‍यांनी या चोरीची तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दरम्‍यान, सोनाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सगोडा येथील लक्ष्मण राऊत या शेतकऱ्याची दुचाकी २८ ऑगस्ट रोजी चोरीस गेली होती. या घटनेला तीन दिवसांचा अवधी लोटत नाही तोच चोरट्यांनी शो रूम फोडून दुचाकी चोरून नेल्या आहेत.