राखी बांधून परतणारा भाऊ रेल्वेखाली येऊन ठार!; चुकून दुसऱ्याच रेल्वेत बसले होते…,मलकापूरची घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अकोला येथील बहिणीकडून राखी बांधून मलकापूरला परतताना मलकापूर रेल्वेस्टेशनवर भावाचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल, २ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. मलकापूर येथील शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते मदन लखनी (६७, श्रीनिवास सोसायटी, बिर्ला रोड) हे अकोला येथे त्यांच्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेले …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अकोला येथील बहिणीकडून राखी बांधून मलकापूरला परतताना मलकापूर रेल्वेस्टेशनवर भावाचा अपघात झाला. या अपघातात त्‍यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल, २ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.

मलकापूर येथील शेतकरी संघटनेचे ज्‍येष्ठ नेते मदन लखनी (६७, श्रीनिवास सोसायटी, बिर्ला रोड) हे अकोला येथे त्यांच्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेले होते. अकोला रेल्वे स्थानकावरून हावडा मेलमध्ये बसण्याऐवजी ते चुकून ज्ञानेश्वरी एक्‍स्‍प्रेसमध्ये बसले. ज्ञानेश्वरी एक्‍स्‍प्रेसला मलकापूर स्थानकावर थांबा नव्हता. मलकापूर स्थानकावरून गाडी जात असताना गाडीचा वेग कमी झाला. त्यावेळी धावत्या गाडीतून उतरण्याच्या नादात त्यांचे दोन्ही पाय रेल्वेच्‍या चाकाखाली गेल्याने कटले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे.