रंगेल म्‍हाताऱ्याचे विकृत चाळे!; १२ वर्षांच्‍या मुलीच्‍या घरात घुसून अतिप्रसंगाचा प्रयत्‍न!!; चिखली तालुक्‍यातील धक्‍कादायक घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १२ वर्षीय मुलीचा ५५ वर्षांच्या म्हाताऱ्याने विनयभंग केला. ही धक्कादायक घटना देऊळगाव घुबे (ता. चिखली) येथे १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. मुलीच्या वडिलांनी अंढेरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून रंगनाथ सखाराम घुबे (रा. देऊळगाव घुबे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, १५ ऑक्टोबर रोजी या रंगेल म्हाताऱ्याला पोलिसांनी …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १२ वर्षीय मुलीचा ५५ वर्षांच्‍या म्‍हाताऱ्याने विनयभंग केला. ही धक्कादायक घटना देऊळगाव घुबे (ता. चिखली) येथे १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. मुलीच्या वडिलांनी अंढेरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून रंगनाथ सखाराम घुबे (रा. देऊळगाव घुबे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल, १५ ऑक्टोबर रोजी या रंगेल म्‍हाताऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम असल्याने देऊळगाव घुबे येथील अल्पवयीन मुलीचे आई- वडील सकाळीच सोयाबीन सोंगायला गेले होते. रंगनाथ घुबे हा मुलीच्या घरात घुसला व त्याने आतून कडी लावली. त्याने मुलीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात मुलीची आजी घरी आल्याने आरोपीने पळ काढला. मुलीच्या आई- वडिलांना ही माहिती देण्यात आली. त्यांनी लगेच अंढेरा पोलीस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार दिली.