मोबाइल हिसकावून दुचाकीस्वार सुसाट!; शेगाव शहरातील रात्रीची घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्याने जाणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा मोबाइल हिसकावून ट्रिपल सीट दुचाकीस्वारांनी पळ काढला. ही घटना काल, १६ सप्टेंबरच्या रात्री अकराच्या सुमारास शेगाव – खामगाव रोडवरील बोंद्रे निवासाजवळ घडली. उदय मुरलीधर गांधी (१७, रा. सद्गुरूनगर, शेगाव) हा रस्त्याने फिरत होता. तेव्हा मागून एका दुचाकीवर तिघे जण आले. त्यांनी उदयजवळ गाडी थांबवली. त्याच्या …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्याने जाणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा मोबाइल हिसकावून ट्रिपल सीट दुचाकीस्वारांनी पळ काढला. ही घटना काल, १६ सप्टेंबरच्या रात्री अकराच्या सुमारास शेगाव – खामगाव रोडवरील बोंद्रे निवासाजवळ घडली.

उदय मुरलीधर गांधी (१७, रा. सद्‌गुरूनगर, शेगाव) हा रस्त्याने फिरत होता. तेव्हा मागून एका दुचाकीवर तिघे जण आले. त्यांनी उदयजवळ गाडी थांबवली. त्‍याच्या हातातून मोबाइल हिसकावून तिघांनी दुचाकी सुसाट पळवली. उदयच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.