मार्केटिंगसाठी बाहेर पडलेला व्‍यक्‍ती गायब!; खामगावातील प्रकार, पत्‍नीची पोलिसांत धाव

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मार्केटिंग करण्याचे काम करणारा व्यक्ती खामगावमधून बेपत्ता झाला आहे. तो हरवल्याची तक्रार आज, २९ ऑगस्टला त्याच्या पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. जुगलकिशोर मोहनलाल सारस्वत (३६, रा. हिंगोली ह. मु. किसाननगर, खामगाव) असे बेपत्ता झालेल्याचे नाव आहे. २५ ऑगस्टला ते सकाळी अकराला नेहमीप्रमाणे हिरोहोंडा मोटारसायकलीने (MH 34 N 9269) मार्केटिंगसाठी …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मार्केटिंग करण्याचे काम करणारा व्‍यक्‍ती खामगावमधून बेपत्ता झाला आहे. तो हरवल्याची तक्रार आज, २९ ऑगस्‍टला त्‍याच्या पत्‍नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

जुगलकिशोर मोहनलाल सारस्वत (३६, रा. हिंगोली ह. मु. किसाननगर, खामगाव) असे बेपत्ता झालेल्याचे नाव आहे. २५ ऑगस्‍टला ते सकाळी अकराला नेहमीप्रमाणे हिरोहोंडा मोटारसायकलीने (MH 34 N 9269) मार्केटिंगसाठी गेले. मात्र रात्री घरी न आल्याने त्‍यांची पत्‍नी गायत्री यांनी वारंवार मोबाइलवर कॉल केले. पण मोबाइल बंद दाखवत होता. त्‍यांनी पतीचा नातेवाइक व मार्केटिंग करत असलेल्या ठिकाणीही शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. अखेर आज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जुगलकिशोर यांचे वर्णन असे ः रंग सावळा, उंची ६ फूट, बांधा सडपातळ, चेहरा गोल, केस काळे, हनवटीला जुन्या जखमेचा व्रण, फुल बायाचा शर्ट ग्रे कलर, फुल पॅन्ट काळपट रंग, हातात पितळाचा कडा, पायात चप्पल काळी. तपास सहायक फौजदार श्री. खुटे करत आहेत.

दोन महिला बेपत्ता
जिल्ह्यातून आज, २९ ऑगस्‍टला दोन महिलाही बेपत्ता झाल्याच्या नोंदी पोलिसांत झाल्या आहेत. जळगाव जामोद तालुक्‍यातील गाडेगाव खुर्द येथील सौ. जया पंजाबाराव शेले ही २२ वर्षीय विवाहिता व नांदुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक भागातील कविता विनोद वाकोडे ही ३२ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. त्‍या हरवल्याची नोंद जळगाव जामोद आणि नांदुरा पोलिसांत करण्यात आली आहे.