भांडण सोडवायला सरपंच गेले… भांडणारे म्‍हणतात, तुलाच कापून टाकतो!; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोघांचे भांडण सोडवायला जाणे सरपंचाला चांगलेच महागात पडले. भांडणाऱ्याने त्यांनाच अश्लील शिविगाळ करून कापून टाकण्याची धमकी दिली. सरपंचाच्या तक्रारीवरून या प्रकरणात खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल गुणवंत लहाने हे तरोडा कसबा (ता. शेगाव) येथील सरपंच आहेत. काल, २३ जुलैच्या रात्री आठला गावातील विजय एकनाथ कळसकार याच्या दुकानासमोर …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोघांचे भांडण सोडवायला जाणे सरपंचाला चांगलेच महागात पडले. भांडणाऱ्याने त्‍यांनाच अश्लील शिविगाळ करून कापून टाकण्याची धमकी दिली. सरपंचाच्‍या तक्रारीवरून या प्रकरणात खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

राहुल गुणवंत लहाने हे तरोडा कसबा (ता. शेगाव) येथील सरपंच आहेत. काल, २३ जुलैच्‍या रात्री आठला गावातील विजय एकनाथ कळसकार याच्‍या दुकानासमोर ते उभे होते. तेव्‍हा रूपेश अरुण कवळकार व विजय एकनाथ कळसकार यांच्‍यात भांडण सुरू झाले. विजय दारू पिलेला होता. सरपंच या नात्याने लहाने हे भांडण सोडवायला गेले.

तेव्‍हा “तुला कापून टाकतो. तुला आमच्‍या मधात बोलायची गरज काय?’ अशी अश्लील शिविगाळ विजयने केली. तुला कोण्यातरी केसमध्ये फसवून टाकेल. अशी धमकीही दिली. विजय कळसकार नेहमी दारू पितो व कोणालाही धमक्‍या देतो. गावात कोणालाही शिविगाळ करतो, असे सरपंचांनी तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.