भररस्त्यात सुरू होती ढिश्यूम ढिश्यूम… पोलिसांनी नेले पकडून!, मलकापुरातील घटना
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भररस्त्यात ढिश्यूम ढिश्यूम करणाऱ्या दोघांना मलकापूर शहर पोलिसांनी काल, ८ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास मलकापूर शहरातील माताकालीनगरात बसस्थानकासमोर ताब्यात घेतले.
अमोल भाऊराव भवरे (२८, रा. धरणगाव ता. मलकापूर), ईश्वर अशोक मेसरे (२७, रा. नरवेल ता. मलकापूर) अशी दोघांची नावे असून, त्यांच्याविरुद्ध पोकाँ आसिफ शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोलिंग करताना पोलिसांना अमोल आणि ईश्वर रस्त्यावरच लाथाबुक्क्यांनी एकमेकांवर तुटून पडले होते. पोलीस आले तरी ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. तपास नापोकाँ अमोल शैले करत आहेत. नापोकाँ संतोष सोनोने यांनी गुन्हा दाखल करून घेतला.