भरधाव ट्रकने कारला उडवले, पाच जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक; खामगाव तालुक्‍यातील दुर्घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा )ः भरधाव ट्रकने कारला उडवले. यात कारमधील पाच जण जखमी झाले. ही घटना खामगाव- अकोला रोडवरील कोलोरी फाट्याजवळ (ता. खामगाव) आज, ३ ऑक्टोबरला सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडली. शेख बिलाल शेख अस्लम, शेख मुजम्मील शेख मुश्ताक, शेख मतीन, शेख अन्सार व मो. अतहर (रा. जुना फैल, खामगाव) अशी जखमींची …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा )ः भरधाव ट्रकने कारला उडवले. यात कारमधील पाच जण जखमी झाले. ही घटना खामगाव- अकोला रोडवरील कोलोरी फाट्याजवळ (ता. खामगाव) आज, ३ ऑक्‍टोबरला सकाळी पावणेबाराच्‍या सुमारास घडली.

शेख बिलाल शेख अस्लम, शेख मुजम्मील शेख मुश्ताक, शेख मतीन, शेख अन्सार व मो. अतहर (रा. जुना फैल, खामगाव) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व जण कारने बाळापूरला लग्नसमारंभासाठी जात होते. कोलोरी फाट्याजवळ अचानक समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. यात अल्टो कारचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमींना ग्रामस्‍थांनी तातडीने खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर त्‍यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.