भरधाव ट्रक उलटला; चेंगरून गायीचा मृत्यू; देऊळगाव राजा येथील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव ट्रक उलटून एक गाय चेंगरली गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. चालकास किरकोळ दुखापत झाली. ही घटना देऊळगावराजा शहरातील जाफराबाद बायपासजवळील टी पॉईंटवर आज, २५ ऑगस्टला सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.एमएच १० सीआर ५५६२ क्रमांकाचा ट्रक सांगलीवरून वाराणसीला मनुके घेऊन जात होता. देऊळगाव राजा शहरातील बायपासमार्गे जात असताना …
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव ट्रक उलटून एक गाय चेंगरली गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. चालकास किरकोळ दुखापत झाली. ही घटना देऊळगावराजा शहरातील जाफराबाद बायपासजवळील टी पॉईंटवर आज, २५ ऑगस्‍टला सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
एमएच १० सीआर ५५६२ क्रमांकाचा ट्रक सांगलीवरून वाराणसीला मनुके घेऊन जात होता. देऊळगाव राजा शहरातील बायपासमार्गे जात असताना गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात जाफराबाद चौफुलीजवळ ट्रक उलटला. या ट्रकखाली चेंगरल्याने गायीचा जागीच मृत्यू झाला तर ट्रकचालकाला किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे राहुल दांडगे, शीतल नांदवे यांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.