बुलडाण्यातील सायकलपटू संजय मयुरे करणार श्रीनगर ते कन्याकुमारी सायकलिंग

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा येथील सायकलपटू संजय मयुरे (५०) हे श्रीनगर येथील लाल चौक ते कन्याकुमारीपर्यंत सायकलीने प्रवास करणार आहेत. आज, २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातला जयस्तंभ चौकातून मयुरे यांनी श्रीनगरकडे प्रस्थान केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, जयश्री शेळके यांच्यासह बुलडाणा शहरातील सायकलपटू व क्रीडा प्रेमी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा येथील सायकलपटू संजय मयुरे (५०) हे श्रीनगर येथील लाल चौक ते कन्याकुमारीपर्यंत सायकलीने प्रवास करणार आहेत. आज, २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातला जयस्तंभ चौकातून मयुरे यांनी श्रीनगरकडे प्रस्थान केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, जयश्री शेळके यांच्यासह बुलडाणा शहरातील सायकलपटू व क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते.

७ ऑक्टोबर रोजी श्रीनगर येथील लाल चौकातून श्री. मयुरे यांच्या सायकल यात्रेला सुरुवात होणार आहे. ३१ डिसेंबर रोजी कन्याकुमारी येथे पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. बुलडाणा शहरात सायकलिंगची क्रेझ वाढावी, डॉक्टर, वकील, अधिकारी, पोलीस अधिका नी महिन्यातील किमान एक दिवस तरी सायकलीने प्रवास करावा. त्यामुळे इतर नागरिकांना सुद्धा सायकलिंगला प्रोत्साहन मिळेल. सायकलिंगने जीवन आरोग्यदायी राहण्यास मदत होते, असे श्री. मयुरे यावेळी म्हणाली.