पानटपरी येणाऱ्या गिऱ्हाईकांसोबत का बोलत असते… म्‍हणत २७ वर्षीय विवाहितेला बेदम मारहाण!; मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पानटपरीवर येणाऱ्या गिऱ्हाईकांसोबत का बोलत असते असे म्हणून विवाहितेला बेदम मारहाण करणाऱ्या पती व त्याला भडकावणाऱ्या सासूविरुद्ध डोणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मेहकर तालुक्यातील विश्वी येथे २५ ऑगस्टच्या रात्री साडेआठला घडली. या प्रकरणात सौ. वैशाली अमोल सदार (२७, रा. विश्वी) हिने तक्रार दिली. पती अमोल नामदेव सदार, …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पानटपरीवर येणाऱ्या गिऱ्हाईकांसोबत का बोलत असते असे म्‍हणून विवाहितेला बेदम मारहाण करणाऱ्या पती व त्‍याला भडकावणाऱ्या सासूविरुद्ध डोणगाव पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना मेहकर तालुक्‍यातील विश्वी येथे २५ ऑगस्‍टच्‍या रात्री साडेआठला घडली. या प्रकरणात सौ. वैशाली अमोल सदार (२७, रा. विश्वी) हिने तक्रार दिली.

पती अमोल नामदेव सदार, सासू मणकर्णाबाइ नामदेव सदार (दोन्ही रा. विश्वी) अशी आरोपींची नावे आहेत. वैशालीने तक्रारीत म्‍हटले आहे, की अमोल दारू पिण्याच्‍या सवयीचा आहे. तो घरी दारू पिऊन आला. त्यास जेवणाचे ताट वाढले असता त्याने ताट फेकून दिले. तू पानटपरीवर येणाऱ्या गिऱ्हाइकांसोबत जास्त वेळ का बोलत राहते, असे म्हणून वैशालीला शिविगाळ करू लागला.

सासू मणकर्णाबाईने हिला तू रोज मारत जा, असे म्हणून त्याला भडकावून दिले. तिच्या सांगण्यावरून अमोलने वैशालीला चापटबुक्‍क्‍यांनी तोंडावर व डोक्यावर मारहाण केली. घरात असलेली काठी उचलून मांडीवर मारून जखमी केले, असे तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून डोणगाव पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. तपास बीट जमादार दिलीप राठोड करत आहेत.