पहाटे अडीचला आई- वडिलांना आली जाग, पाहतात तर अल्पवयीन मुलगी गायब!; अपहरणाचा संशय!!, चिखलीतील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या आईने काल, १३ सप्टेंबर रोजी चिखली पोलीस ठाण्यात दिली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार ते मूळचे जालना जिल्ह्यातील वरुड येथील असून, मजुरीसाठी चिखली शहरातील सिद्धार्थनगरात राहतात. त्यांना ४ मुली व एक मुलगा आहे. दोघींचे लग्न झाले आहे. १० सप्टेंबर रोजी …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या आईने काल, १३ सप्टेंबर रोजी चिखली पोलीस ठाण्यात दिली आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार ते मूळचे जालना जिल्ह्यातील वरुड येथील असून, मजुरीसाठी चिखली शहरातील सिद्धार्थनगरात राहतात. त्यांना ४ मुली व एक मुलगा आहे. दोघींचे लग्न झाले आहे. १० सप्टेंबर रोजी रात्री सर्व जण जेवण करून झोपले. रात्री अडीचला जाग आली असता त्यांना मुलगी दिसली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. अल्पवयीन मुलीचे कुणीतरी अपहरण केले असावे, असा संशय मुलीच्या आईला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.