पत्नी सुंदर दिसत नाही म्हणून तिहेरी तलाक; चिखली तालुक्यातील प्रकार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पत्नी सुंदर दिसत नाही व माहेरवरून पैसे आणत नाही म्हणून सासरच्या मंडळीने वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या १९ वर्षीय विवाहितेचा छळ मांडला. मारहाण करून तिला पतीने घराबाहेर काढले. त्यानंतर तिच्या माहेरी जाऊन तिहेरी तलाक दिला, अशी तक्रार चिखली पोलीस ठाण्यात विवाहितेने केली. त्यावरून सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपी …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पत्नी सुंदर दिसत नाही व माहेरवरून पैसे आणत नाही म्हणून सासरच्या मंडळीने वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या १९ वर्षीय विवाहितेचा छळ मांडला. मारहाण करून तिला पतीने घराबाहेर काढले. त्‍यानंतर तिच्‍या माहेरी जाऊन तिहेरी तलाक दिला, अशी तक्रार चिखली पोलीस ठाण्यात विवाहितेने केली. त्‍यावरून सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपी साखरखेर्डा (ता. सिंदखेड राजा) येथील रहिवासी आहेत.

नयनाजबी हासिफ शहा (१९, रा. मकरध्वज खंडाळा) हिचे लग्न जून २०२० मध्ये साखरखेर्डा येथील अशिफशाह मुनिरशाह याच्यासोबत झाले होते. विवाहितेला चार महिनेच चांगले वागविले. नंतर तू सुंदर दिसत नाही. तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा कमी दिला. आमचा मानपान चांगला केला नाही. महागड्या वस्तू दिल्या नाहीत व लग्न साधे केले, असे टोमणे देत तिचा छळ सासरच्यांनी सुरू केला, असे तक्रारीत म्हटले आहे. पती नेहमी पट्ट्याने मारहाण करत होता. नंतर सासूच्या उपचारासाठी माहेरहून १ लाख रुपये आणण्याची मागणी केली. ऐपत नसताना विवाहितेच्या वडिलांनी घर विकून १ लाख रुपये दिले. नंतर पुन्हा धंद्यासाठी १ लाख रुपये आणण्याची मागणी केली. विवाहितेने माझे वडील गरीब आहेत, असे म्हटल्यावर पती, सासू, जेठ व जेठाणीने शिविगाळ व मारहाण केली.

अंगावरील दागिने काढून घेतले व तिला घराबाहेर हाकलले. त्यामुळे विवाहिता माहेरी खंडाळा मकरध्वज येथे आली. २१ मार्च रोजी पती व सासरची मंडळी विवाहितेच्या माहेरी आले. १ लाख रुपये देणार नसाल तर फारकती द्या, अशी मागणी केली. विवाहितेला संसार करावयाचा असल्याने तिने फारकतीला नकार दिला. तेव्हा पतीने “मैने मेरे बिवी नयनाजबी को तलाक दिया हैं’ असे तीनदा म्हणाला व निघून गेला, असे तक्रारीत म्हटले आहे. महिला तक्रार निवारण केंद्रात समझोता न झाल्याने विवाहितेने २२ ऑगस्ट रोजी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून विवाहितेचा पती अशिफाशाह मुनिरशाह, सासू रमशानबी मुनिरशाह, जेठानी राणी अशपाकशहा, तैजीबशाह मुनीरशाह, सुमैया तैजीबशहा, अन्सारशहा मुनिरशहा (सर्व रा. साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.