निपानामध्ये राजकीय वाद पेटला; दोन गटांत तुंबळ हाणामारी, ७ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निपाना (ता. मलकापूर) येथील राजकीय धुसफूस मोठ्या भांडणात रूपांतरीत झाली. दोन्ही गट थाटे कुटुंबीय असून, मारहाण, अश्लील शिविगाळ केल्यावरून पहिल्या गटातील चौघे आणि दुसऱ्या गटातील तिघांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल, २ ऑक्टोबरला सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. दुसऱ्या गटातील सौ. मिनाक्षी विनोद …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निपाना (ता. मलकापूर) येथील राजकीय धुसफूस मोठ्या भांडणात रूपांतरीत झाली. दोन्‍ही गट थाटे कुटुंबीय असून, मारहाण, अश्लील शिविगाळ केल्यावरून पहिल्या गटातील चौघे आणि दुसऱ्या गटातील तिघांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. काल, २ ऑक्‍टोबरला सायंकाळी सहाच्‍या सुमारास ही घटना घडली.

दुसऱ्या गटातील सौ. मिनाक्षी विनोद थाटे (३४, रा. निपाना) यांच्‍या तक्रारीवरून प्रकाश थाटे, सौ. पद्माबाई प्रकाश थाटे, सहदेव प्रकाश थाटे, आशा सहदेव थाटे (सर्व रा. निपाना) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. सौ. मिनाक्षी या पतीसोबत मोटारसायकलीने घरी येत होत्या. त्‍यावेळी प्रकाशने त्‍यांची मोटारसायकल अडवली. मागील भांडणाच्‍या कारणावरून अश्लील शिविगाळ केली. त्‍यानंतर हे दाम्‍पत्‍य घरी गेले असता प्रकाश, सौ. पद्माबाई, सहदेव, आशा यांनी त्‍यांच्‍या घरासमोर येऊन सौ. मिनाक्षी यांच्‍या पतीच्‍या डाव्या हाताला चावा घेतला. मिनाक्षीच्‍या सासूलाही मारहाण केली. तपास हुसेन पटेल करत आहेत.

पहिल्या गटातील प्रकाश थाटे (६७, रा. निपाना) यांच्‍या तक्रारीवरून विनोद रामा थाटे, लक्ष्मीबाई रामा थाटे, मिनाक्षी विनोद थाटे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे, की सकाळी ९ च्‍या सुमारास ग्रामपंचायतीत जात असताना विनोद आणि लक्ष्मीबाई यांनी तू ग्रामसभा कशी घेतो ते पाहतो, असे म्हणून शिविगाळ केली. घरात घुसून मागील भांडणाच्‍या कारणावरून लोखंडी सळईने मारहाण केली. त्‍यांची पत्नी आवरण्यास आली असता तिलाही चापटाबुक्‍क्यांनी मारहाण केली. लक्ष्मीबाई व मिनाक्षी यांनी प्रकाश व त्‍यांच्‍या पत्नीला चापटबुक्‍क्यांनी मारहाण केली. तपास पोहेकाँ हुसेन पटेल करत आहेत.