दोनदा प्रयत्‍न केला होता, तिसऱ्या वेळेस मृत्‍यूशी गळाभेट घेतलीच!; नांदुरा शहरातील घटना

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता नांदुरा शहरातील शिवाजीनगर भागात उघडकीस आली. गजानन महादेव खेतकर (४५, रा. शिवाजीनगर, नांदुरा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नांदुरा पोलीस ठाण्यात याबाबत खेतकर यांचा मुलगा विजय गजानन खेतकर …
 

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता नांदुरा शहरातील शिवाजीनगर भागात उघडकीस आली.

गजानन महादेव खेतकर (४५, रा. शिवाजीनगर, नांदुरा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नांदुरा पोलीस ठाण्यात याबाबत खेतकर यांचा मुलगा विजय गजानन खेतकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार वडिलांना दारूचे व्यसन होते. यापूर्वीदेखील दोन वेळेस विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

आज पहाटे त्यांनी राहत्या घरातील टिनाच्या खाली लावलेल्या लाकडी बल्लीला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. आत्‍महत्‍येचे कारण वृत्त लिहीपर्यंत समोर आले नाही. तपास पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गजानन सातव करत आहेत.