दोन दुचाकींची धडक, एकाचा जागीच मृत्‍यू, दुसरा गंभीर; बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना काल, १९ ऑगस्ट रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास चिखली- बुलडाणा रोडवरील साखळी फाट्याजवळ घडली. श्यामराव आनंदा चौधरी (६२, रा. साखळी) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर बबलू चंदेल (३०, रा. साखळी) …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना काल, १९ ऑगस्ट रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास चिखली- बुलडाणा रोडवरील साखळी फाट्याजवळ घडली.

श्यामराव आनंदा चौधरी (६२, रा. साखळी) असे अपघातात ठार झालेल्या व्‍यक्‍तीचे नाव आहे, तर बबलू चंदेल (३०, रा. साखळी) गंभीर जखमी झाले आहेत. चौधरी बुलडाण्यावरून साखळीकडे तर चंदेल चिखलीवरून सावळाकडे जात होते. साखळी फाट्यावर दोन्ही दुचाकींची धडक झाली. यात चौधरी जागीच ठार झाले. गंभीर जखमी बबलू यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले आहे. चौधरी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत.