दोन दिवसांत पाच बेपत्ता, एका २२ वर्षीय तरुणीचा समावेश
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या दोन दिवसांत (८ व ९ सप्टेंबर) चार जण जिल्ह्यातून बेपत्ता झाले आहेत. यात २२ वर्षीय तरुणीचा समावेश आहे.
देऊळगाव राजा शहरातील स्वामी विवेकानंदनगर येथील रहिवासी जयश्री अनिल डोंगरे (२२) या त्यांचा चिमुकला अर्जुनसह बेपत्ता झाल्याची नोंद ८ सप्टेंबरला देऊळगाव पोलिसांनी केली आहे. जळगाव जामोद येथील भीमनगरातील रहिवासी सौ. संजना आकाश तायडे ही १९ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद जळगाव जामोद पोलिसांनी केली आहे.
शेगाव शहरातील म्हाडा कॉलनीतील रहिवासी प्रकाश सुकदेव मानकर (४५) हा व्यक्ती आज, ९ सप्टेंबरला बेपत्ता झाल्याची नोंद शेगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चिखली शहरातूनही एक जण बेपत्ता असून, त्याचे नाव विलास सीताराम हिवाळे (५५) असे आहे. ते खामगाव चौफुली भागात राहतात. घरातून कुणाला काही न सांगता ते निघून गेले.