दोन अल्पवयीन मावसबहिणींना तो म्हणाला, तुम्ही दोघीही मला खूप आवडता; दोघींचाही धरला हात; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शौचाला जात असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आला. दोन्ही अल्पवयीन मुली नात्याने एकमेकांच्या मावसबहिणी आहेत. ही घटना काल, 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नागझरी (ता. खामगाव) येथे घडली. पीडित अल्पवयीन मुलींचे वय एकीचे 15 तर दुसरीचे 17 वर्षे आहे. याप्रकरणी पीडित मुलीने आज, 9 ऑगस्ट रोजी दिलेल्या …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शौचाला जात असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आला. दोन्ही अल्पवयीन मुली नात्याने एकमेकांच्या मावसबहिणी आहेत. ही घटना काल, 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नागझरी (ता. खामगाव) येथे घडली. पीडित अल्पवयीन मुलींचे वय एकीचे 15 तर दुसरीचे 17 वर्षे आहे. याप्रकरणी पीडित मुलीने आज, 9 ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीवरून परसराम कृपाल लिकडे (20, रा. नागझरी ता. खामगाव) याच्‍याविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागझरी येथील दोन्ही बहिणी काल संध्याकाळी सातच्या सुमारास शौचाला जात होत्‍या. त्यावेळी परसरामने मागून जाऊन दोघींचा हात पकडला. तुम्ही दोघी मला खूप आवडता… माझ्या जवळ या… असे म्हणत त्याने दोघींना जवळ ओढले. दोघींनी आरडाओरड केल्याने जवळच मंदिरावर असलेले काही लोक धावत आले. तेव्हा तो हात सोडून पळाला व जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पीडित मुलीने पोलीस ठाण्यात दिली आहे.