देऊळगाव राजात वाढल्‍या दुचाकी चोऱ्या; आजही एकाची मोटारसायकल गेली, पण चोरटा झालाय “सीसीटीव्‍ही’त कैद!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांत देऊळगाव राजा शहर व तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आज, २९ ऑगस्टलाही आणखी एक दुचाकी चोरीस गेली. शहरातील डाॅ. अमोल कोल्हे यांच्या हाॅस्पिटलसमोरून चोरट्याने दुचाकी लंपास केली. त्याचा हा कारनामा मात्र समोरील दुकानाच्या सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाला आहे.जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील शिराळा …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांत देऊळगाव राजा शहर व तालुक्‍यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्‍या आहेत. आज, २९ ऑगस्‍टलाही आणखी एक दुचाकी चोरीस गेली. शहरातील डाॅ. अमोल कोल्हे यांच्या हाॅस्पिटलसमोरून चोरट्याने दुचाकी लंपास केली. त्‍याचा हा कारनामा मात्र समोरील दुकानाच्‍या सीसीटीव्‍हीत कॅमेरात कैद झाला आहे.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथील अनंथा शिराळकर हे इंजेक्शन घेण्यासाठी राजयोगी हाॅस्पिटलमध्ये आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच २१ आय ५९३४) दवाखान्यासमोर उभी केलेली होती. इंजेक्शन घेऊन परत आले तेव्‍हा दुचाकी गायब दिसली. त्यांनी समोर असलेल्या दीपाली प्रिंटिंग प्रेसचे सीसीटीव्ही फूटेज तपासले असता एका युवकाने गाडी नेल्याचे दिसून आले. तात्काळ त्यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तपास पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.