दहावीतील मुलीचे मेहकरमधून अपहरण!; क्‍लासेसला जाते म्‍हणाली होती…

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १० वीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार तिच्या वडिलांनी मेहकर पोलीस ठाण्यात काल, २४ ऑगस्टला दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंत्री देशमुख येथील अल्पवयीन मुलगी जिजामाता कन्या शाळेत १० वीत शिकते. मेहकरातील बालाजी क्लासेस येथे तिने ट्युशन क्लास लावला आहे. २१ ऑगस्टला क्लासला जाते सांगून ती …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १० वीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार तिच्या वडिलांनी मेहकर पोलीस ठाण्यात काल, २४ ऑगस्टला दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अंत्री देशमुख येथील अल्पवयीन मुलगी जिजामाता कन्या शाळेत १० वीत शिकते. मेहकरातील बालाजी क्लासेस येथे तिने ट्युशन क्लास लावला आहे. २१ ऑगस्टला क्लासला जाते सांगून ती मेहकरला गेली होती. मात्र वेळेत परतली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी मेहकर शहर, तसेच नातेवाइकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. अखेर काल, २४ ऑगस्ट रोजी मुलीच्या वडिलांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, मुलीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याचे म्हटले आहे.