तुम्‍हाला माहितेय? बुलडाणा जिल्ह्यात आहे एक देशासाठी लढणारे गाव… अहो घराघरात आहे सैनिक…! आज याच गावात झालाय एक अनोखा सोहळा…!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुम्हाला माहीत नसेल की आपल्या जिल्ह्यात एक गाव असेही आहे, तिथे घराघरात सैनिक आहे. देशासाठी लढणाऱ्या या गावात आज, १ ऑक्टोबरला अनोखा सोहळा झाला. महार रेजिमेंटच्या ८० व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील आजी- माजी सैनिकांचा गौरव सोहळा या भादोला गावात (ता. बुलडाणा) पार पडला. गावात ५०० पेक्षा जास्त सैनिक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुम्‍हाला माहीत नसेल की आपल्या जिल्ह्यात एक गाव असेही आहे, तिथे घराघरात सैनिक आहे. देशासाठी लढणाऱ्या या गावात आज, १ ऑक्‍टोबरला अनोखा सोहळा झाला. महार रेजिमेंटच्या ८० व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील आजी- माजी सैनिकांचा गौरव सोहळा या भादोला गावात (ता. बुलडाणा) पार पडला.

गावात ५०० पेक्षा जास्त सैनिक आहेत. जिल्हाभरातील माजी सैनिकांनी सकाळी गावातून रूट मार्च काढला. भारत माता की जय… या घोषणेने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. देशसेवेसाठी लढणाऱ्या या जवानांचे स्वागत करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. वयाची शंभरी पार केलेले स्वातंत्र्य सैनिक सय्यद मुनाफ, माधवराव उबरहंडे सुद्धा या कार्यक्रमात उत्साहात सहभागी झाले होते.

देशसेवेचा हा वारसा पुढील पिढीने जपला पाहिजे, असे स्वातंत्र्यसैनिक माधवराव उबरहंडे “बुलडाणा लाइव्ह’शी बोलताना म्हणाले. सेवानिवृत्त सैनिक, त्यांचे परिवार, सैन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, तहसीलदार रुपेश खंडारे, डॉ. पंकज लद्धड, सरपंच प्रमोद वाघमारे, उपसरपंच शेख आमीन खाँ यांच्यासह जिल्हाभरातील आजी -माजी सैनिक उपस्थित होते. यशसिद्धी सैनिक संघ व भादोला ग्रामपंचायतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.