तीन तरुणांनी ऑटोरिक्षाचालकाला लुटले!; बुलडाणा बसस्‍थानकासमोरील रात्रीची घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तीन तरुणांनी ऑटोरिक्षाचालकाला लुटल्याची घटना बुलडाणा शहरात समोर आली आहे. आधी सिगारेटसाठी त्याला ४० रुपये मागितले. त्याने नकार दिला असता जबर मारहाण करून जबरदस्ती खिशातील ५ हजार रुपये हिसकावून त्यांनी पळ काढला. ही घटना बसस्थानकासमोरील तुळजाभवानी पान सेंटरजवळ काल, ३ सप्टेंबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. शेख नाजिम शेख करीम (२५, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तीन तरुणांनी ऑटोरिक्षाचालकाला लुटल्‍याची घटना बुलडाणा शहरात समोर आली आहे. आधी सिगारेटसाठी त्‍याला ४० रुपये मागितले. त्‍याने नकार दिला असता जबर मारहाण करून जबरदस्ती खिशातील ५ हजार रुपये हिसकावून त्‍यांनी पळ काढला. ही घटना बसस्‍थानकासमोरील तुळजाभवानी पान सेंटरजवळ काल, ३ सप्‍टेंबरला रात्री पावणेदहाच्‍या सुमारास घडली.

शेख नाजिम शेख करीम (२५, रा. देऊळघाट, ता. बुलडाणा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. ते ऑटोचालक आहेत. काल रात्री ते अॉटो घेऊन तुळजा भवानी पान सेंटरजवळ असताना ओळखीचे आकाश हरी राठोड (रा. खडकी), धीरज सुरेश मोकळे (रा. महात्मा फुले शाळेजवळ, बुलडाणा), बबलू झुझोर (रा. जुना गाव, बुलडाणा) भेटले. त्‍यांनी शेख नाजिमला सिगारेट पिण्यासाठी ४० रुपये मागितले. नाजिमने नकार दिला असता तिघांनी चापटबुक्‍क्यांनी छातीत, डोक्यावर, पाठीवर मारहाण केली. आकाश राठोड याने छातीवर दगड मारला. नंतर तिघांनी खिशातील पाच हजार रुपये जबरीने काढून घेतले व पळून गेले. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास सहायक फौजदार नामदेव खवल करत आहेत.