खामगावात हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंविरुद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा : हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांच्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव येथे कार्यक्रम आयोजित करणारे रवी वसंत माळवंदे यांच्यासह १६ ते १७ जणांचाही संशयितांत समावेश आहे.काल, २७ ऑगस्ट रोजी हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हटकर स्मारक येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. …
 

बुलडाणा : हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांच्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव येथे कार्यक्रम आयोजित करणारे रवी वसंत माळवंदे यांच्यासह १६ ते १७ जणांचाही संशयितांत समावेश आहे.
काल, २७ ऑगस्ट रोजी हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हटकर स्मारक येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. दुचाकी रॅलीला परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांच्‍या जमावबंदी आदेश व कोविड नियमांचा भंग करण्यात आल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे यांनी या प्रकरणाची फिर्याद दिली आहे.