खामगावच्‍या सजनपुरीतून विवाहित महिला, पुरुष बेपत्ता

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातून ३२ वर्षीय पुरुष व ३२ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. दोघेही एकाच भागातील रहिवासी असून, त्यांच्या हरवल्याच्या तक्रारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. सना परविन खलिल खान (३०, रा. सजनपुरी खामगाव) हिने आपला पती खलील खान हसन खान (३२) बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. १३ सप्टेंबरला सकाळी …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातून ३२ वर्षीय पुरुष व ३२ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. दोघेही एकाच भागातील रहिवासी असून, त्‍यांच्‍या हरवल्याच्या तक्रारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

सना परविन खलिल खान (३०, रा. सजनपुरी खामगाव) हिने आपला पती खलील खान हसन खान (३२) बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. १३ सप्‍टेंबरला सकाळी साडेनऊ वाजता तिचा पती गजानन अॉटो पार्टच्या दुकानात रोजंदारीने कामाला जातो म्‍हणून घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत परतला नाही. कामाला असलेल्या ठिकाणी जाऊन, नातेवाइकांकडे शोध घेऊनही तो मिळून आला नाही. अखेर काल, १४ सप्‍टेंबरला तो हरवल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. रंग सावळा, उंची पाच फूट चार इंच, डोक्याचे केस काळे, दाढी बारीक, कपाळावर उजव्या बाजूला तीन ठिपके गोंदलेले, अंगात निळी पँट , काळे शर्ट, पायात काळा बूट असे त्‍याचे वर्णन आहे.

याच भागातील हरिष माणिक गुजरीवाल (३८, रा. अमडापूर नाका सजनपुरी, खामगाव) यांनी त्‍यांची पत्‍नी सौ. राधा माणिक गुजरीवाल (३८) बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. १३ सप्‍टेंबरला दुपारी साडेबारा वाजता महालक्ष्मी पूजेचे सामान आणण्यासाठी मार्केटमध्ये जाते असे म्हणून ती घरून निघून गेली. उशिरापर्यंत परतली नाही. तिचा मार्केट, परिसरात व नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. रंग सावळा, उंची ५ फूट, डोक्याचे केस काळे, लांब चेहरा, लांबट नाक सरळ उजव्या हातावर हरिष व राधा गोंदलेले, अंगात जांभळ्या रंगाची साडी व ब्लाऊज, पायात पिवळी चप्पल असे तिचे वर्णन आहे. दोन्‍ही घटनांचा तपास पोहेकाँ किरण राऊत करत आहेत.

चिखलीतून विवाहिता बेपत्ता
चिखली शहरातील संभाजीनगर येथील सौ. अर्चना शत्रुघ्न नानघुडे ही २९ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार काल, १४ सप्‍टेंबरला चिखली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मलकापुरातून ४१ वर्षीय पुरुष बेपत्ता
मलकापूर येथील टेलिफोन कॉलनीतील नीलेश रामकृष्ण नारखेडे हा ४१ वर्षीय व्‍यक्‍ती बेपत्ता झाल्याची तक्रार त्‍यांच्‍या घरच्यांनी काल, १४ सप्‍टेंबरला मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिली.