खामगाव, चिखली, बिबी, वैरागड, बुलडाणा, शेगावमधून तरुणी, विवाहिता, पुरुष बेपत्ता!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ःखामगाव, चिखली, बिबी (ता. लोणार), वैरागड (ता. चिखली), बुलडाणा, शेगाव येथून आज, ११ सप्टेंबरला बेपत्ता व्यक्तींच्या बातम्या आल्या आहेत. यात दोन तरुणी, दोन विवाहिता व एका पुरुषाचा समावेश आहे. एक विवाहिता आपल्या दोन चिमुकल्यांसह बेपत्ता आहे. वैरागड (ता. चिखली) येथील १८ वर्षीय पल्लवी पुरुषोत्तम पवार ही मुलगी घरातून …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ःखामगाव, चिखली, बिबी (ता. लोणार), वैरागड (ता. चिखली), बुलडाणा, शेगाव येथून आज, ११ सप्‍टेंबरला बेपत्ता व्‍यक्‍तींच्‍या बातम्या आल्या आहेत. यात दोन तरुणी, दोन विवाहिता व एका पुरुषाचा समावेश आहे. एक विवाहिता आपल्या दोन चिमुकल्यांसह बेपत्ता आहे.

  • वैरागड (ता. चिखली) येथील १८ वर्षीय पल्लवी पुरुषोत्तम पवार ही मुलगी घरातून निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार अमडापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
  • खामगाव शहरातील तायडे कॉलनीतील २० वर्षीय पूजा मोहनलाल रामनिवास यादव ही तरुणी घरी कोणी नसताना घरून निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार तिचे वडील मोहनलाल यादव यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. ती काल, १० सप्‍टेंबरच्‍या दुपारी १ ला निघून गेली. बराच शोध घेतल्यानंतर अखेर आज तक्रार देण्यात आली. रंग गोरा, उंची ५ फूट, केस लांब काळे, अंगात ग्रे रंगाचा टॉप व पांढरी लेंगी असून, त्यावर लाल आेढणी आहे. पायात काळी सँडल आहे. तिला हिंदी, मराठी, मारवाडी भाषा बोलता येते. तपास खामगाव शहर पोलीस ठाण्याचे पोहेकाँ विजय मिरगे करत आहेत.
  • चिखली शहरातून पुष्पा गजानन कुसुंबे ही ४० वर्षीय विवाहिता बेपत्ता झाली आहे. ती हरवल्याची नोंद चिखली पोलिसांत काल १० सप्‍टेंबरला करण्यात आली. बिबी येथून ज्‍योती उमेश पवार ही २७ वर्षीय विवाहिता १० सप्‍टेंबरला आपल्या चिमुकल्या मुला-मुलीसह घरातून निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार बिबी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
  • शेगाव शहर पोलीस ठाण्यातही ४५ वर्षीय प्रकाश सुकदेव मानकर हे बेपत्ता झाल्याची तक्रार ९ सप्‍टेंबरला करण्यात आली आहे.