क्रूझरच्या धडकेत नर्स ठार; जळगाव जामोद येथील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः क्रूझरच्या धडकेत जळगाव जामोद येथील येथील नर्स ठार झाल्याची घटना काल, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जळगाव जामोद येथील न्यू इरा हायस्कूलसमोर घडली. शेवंता लक्ष्मण भगत (४७, रा. जळगाव जामोद) असे अपघातात ठार झालेल्या नर्स चे नाव आहे.
शेवंता भगत या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून पायी घरी जात होत्या. न्यू इरा हायस्कूल समोरून जात असताना त्यांना क्रूझरने धडक दिली. अपघातानंतर धडक देणारे वाहन पसार झाले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेवंता जाधव यांच्यावर जळगाव जामोद येथे प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना सामान्य रुग्णालय खामगाव येथे हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा या प्रकरणाची जळगाव जामोद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.